ताज्या घडामोडी

पालकमंत्री सतेज पाटील यांची तोरस्कर चौक, मणेर मस्जिद येथे “चाय पे” चर्चा…..

महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ असताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सकाळी तोरस्कर चौक, मणेर मस्जिद परिसर येथे ‘चाय पे चर्चा’करीत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेत या भागातील नागरिकांशी विकासात्मक कामे आणि विविध बाबींवर चर्चा केली.

आण्णांच्या अकाली जाण्याने ही पोटनिवडणूक भाजपने कोल्हापूरवासीयांवर लादली असून आता आपल्या बहिणीला निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे. आपला आशीर्वाद एका बहिणाला देऊन सर्वांनी ही निवडूक आपली आहे समजून कार्यरत राहावे, असे या माध्यमातून आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथील नागरिकांना केले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. शहराच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला असून पर्यटनदृष्ट्या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच या परिसरामध्ये असलेला जुना शिवाजी पूल, पंचगंगा घाट सुशोभीकरणाचा देखील आराखडा तयार करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांच्या सोबत चर्चा करून लवकरच यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या आखरी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते. मात्र या रस्त्यासाठी देखील 50 लाखांचा भरघोस निधी आपण उपलब्ध करून दिल्याचंही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????