ताज्या घडामोडी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी हे मंगळवार, दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 10:20 वाजता विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 10:55 वाजता शासकीय विश्रामगृह येथून महासैनिक दरबार हॉल बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण. 11 वाजता महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थिती. 11:45 वाजता महासैनिक दरबार हॉल येथून शिवाजी विद्यापीठाकडे प्रयाण. दुपारी 12:00 वाजता शिवाजी विद्यापीठातील शाहू हॉल येथे आयोजित प्रेसिडेंट व चांसलर अवॉर्ड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. दुपारी 12:45 वाजता शिवाजी विद्यापीठ येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. व दुपारी 1:00 वाजता कोल्हापूर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

Related Articles

Back to top button
??????