ताज्या घडामोडी

खासदार संभाजीराजे यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत; हत्ती, घोड्यांच्या लवाजम्यासह मिरवणुक

कोल्हापूर – मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतीनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर खासदार संभाजीराजे प्रथमच कोल्हापुरात आले. यावेळी खासदार संभाजीराजे यांच जंगी स्वागत करण्यात आलं. हत्ती, घोडे, ढोल- ताश्या यांच्या लव्या जम्यासह वाद्यांच्या गजरात त्यांची जंगी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण करवीरनगरी आज शिवाजी चौकात दाखल झाली होती.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्याच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या. हे आंदोलन यशस्वी करून खासदार संभाजीराजे आज गुरूवारी कोल्हापुरात आले. छत्रपती घराण्या विषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे भव्य स्वागत करत, शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रुईकर काँलनी येथे, खासदार संभाजीराजे यांचे सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याना अभिवादन केल्यानंतर शिवाजी चौकात ही स्वागत मिरवणुक आली. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाराजांना अभिवादन केलं. अनेकजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वेश भूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपारीक वेशातील मावळे आणि पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या होत्या. वाद्यपथके, मर्दानी खेळ खेळणारे आखाडे, धनगरी ढोल, वारकरी पथक, लेझीम पथक, तुतारी, झांजपथक यामुळं मिरवणुकीची शोभा वाढली होती. खासदार संभाजीराजे यांचे शिवाजी चौकात आगमन झाल्यानंतर, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. छत्रपती शिवाजी महाराज की जय….. आणि, खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या विजयाच्या घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या पताका आणि नाशिक ढोल यामुळ संपूर्ण परिसर, भगवामय झाला होता. या स्वागत मिरवणुकीमध्ये राजकीय, सामाजिक कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, तसचं विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह कोल्हापूर शहरातील हजारों नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
??????