ताज्या घडामोडी

जीवदान सेवाभावी संस्थेच्यावतीने पवित्र स्वार्थिकाची देवालय चर्चचा(ब्रम्हपुरी) ११६वा वर्धापनदिन संपन्न

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी पुल येथील ऐतिहासिक पवित्र स्वार्थिकाची देवालय चर्चच्या(ब्रह्मपुरी) ११६ वा वर्धापनदिन ‘जीवदान’च्या कार्यालयात संपन्न झाला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक श्री.संतोष जाधव यांच्या हस्ते चर्चच्या तैलचित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्या नंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील विशेष माहिती शाखेचे पोलिस कर्मचारी श्री.रेडेकर यांच्या हस्ते केक कापून चर्चचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

       जीवदानचे अध्यक्ष अरुण खोडवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.फास्टर सचिन वायदंडे यांनी विश्र्वशांती साठी प्रार्थना केली.वसंत लिंगनुरकर यांनी प्रास्ताविक सादर केले.

प्रारंभी पवित्र स्वार्थिकाची देवालय चर्च (ब्रम्हपुरी)चे पालक एस.एन गोगटे यांच्या निधनाबद्दल स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमासाठी श्री.सुशील भांदिगरे,अक्षय बागडी,कुणाल भोसले,बाळासाहेब शिंगटे,भानुदास बनगे,अमित चव्हाण, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे श्री.रेडेकर,नितीन डांगे,रुपाली खोडवे,ज्योती खोडवे,यश रुकडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
??????