ताज्या घडामोडी

शहर वाहतूक शाखेत जागतिक महिला दिन साजरा.

कोल्हापूर ; कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्यावतीने  जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, शहर वाहतूक निरीक्षक स्नेहा गिरी, कृष्णदेव गिरी योगविशारद,  रेणूताई पवार महिला पत्रकार, हेमा पाटील ट्राफिक कॉन्स्टेबल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबल यांचा सत्कार वृक्ष व फुड पॅकेट देऊन महापौरांच्या हस्ते करण्यात आला. व महापौर निलोफर आजरेकर, यांचा सत्कार  देऊन स्नेहा गिरी यांच्या हस्ते करण्यात आला. तर स्नेहा गिरी, यांचा सत्कार  रेणूताई पवार यांनी केला. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी ,आपले विचार व्यक्त करताना यांनी महिला सबलीकरण व सक्षम महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने उभी असून सर्व क्षेत्रात महिला प्रगतशील झाल्याचे व सक्षमपणे ताठ मानेने समाजामध्ये वावरत असल्याचे व कोल्हापूर पुरोगामी विचाराच्या शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चालवत असल्याचे प्रतिपादन केले यावेळी बोलताना केले. याप्रसंगी प्रास्ताविक  रेणूताई पवार यांनी केले तर आभार हेमा पाटील यांनी मांडले . या कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने  जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबल व पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांचा सत्कार पक्षाचे नितीन भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मारुती गायकवाड ,शंकर बंगुरे , श्वेता बदोरेकर , सतीश वटकर , सुरेंद्र माने , महेश कांजर, शुभम चौगुले , शाम अवळकर इ उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
??????