ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी जुने पॉवर टिलर खरेदी न करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर  : काही अधिकृत विक्रेते कर्नाटक राज्यात विक्री झालेले पॉवर टिलर कमी किंमतीत खरेदी करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वितरकांच्या भूलथापांना बळी न पडता असे जुने पॉवर टिलर खरेदी करु नयेत अन्यथा त्यांना अनुदान मिळणार नाही अथवा मिळाले असल्यास वसुल केले जाईल. त्यामुळे पॉवर टिलर खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषि अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर अशा अवजारांचा/यंत्रांचा समावेश आहे. यासाठी भरघोस अनुदान देखील उपलब्ध आहे. तसेच या प्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. वाकुरे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????