ताज्या घडामोडी

पळशिवणेत  खेळ रंगला पैठणीचा-तेजस्विनी पाटील प्रथम विजेत्या-भुदरगड प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पिंपळगाव /वार्ताहर

आयुष्यात सुख आणि दुःखाची सुरेख  किनार असलेली चादर पांघरून जगण्याला बळ देणाऱ्या शेतकरी कष्टकरी, कामकरी आणि घामकरी लोकांच्या जगण्यातला उत्साह, आनंद वाढविताना सूर्य उगविल्यानंतर मावळेपर्यंत  करावी लागणारी ग्रामीण भागातल्या लोकांची कसरत आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. यातच संसाराचा डोलारा सांभाळून चूल आणि मूल यापलीकडे जग दाखविण्यासाठी कुणीतरी धडपडही करावीच लागते. यासाठीच नारी सन्मान आणि अबलेला सबलेची दृष्टी दाखविणाऱ्या भुदरगड प्रतिष्ठानतर्फे पळशिवणे (ता.भुदरगड) येथे उत्कृष्ठ उपक्रम राबविण्यात आला.

रोजच्या जगण्यात व्यस्त असलेल्या स्त्रीला उंबरठ्याबाहेर आणण्यासाठी होम मिनिस्टर अर्थातच खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांचा मानसूबा यशस्वी ठरत आहे. यापूर्वी लहान बारवे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही पिंपळगाव जिल्हापरिषद मतदार संघासाठी खूप काही करण्याचा आपला मानस असल्याचेहि त्यांनी सांगितले.

पैठणीसाठीची चढाओढ आणि चुरस याठिकाणी  पाहायला मिळाली. गावातल्या बऱ्याच महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला.पळशिवणेच्या सरपंच विजय हैबती पोवार, उपसरपंच अर्चना अशोक कुराडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व राजे ग्रुप पळशिवणे यांच्या नियोजनातून नारी शक्तीचा सन्मान होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन साकारले होते.हा कार्यक्रम पळशिवणे हायस्कूलच्या ग्राऊंडवर पार पडलायावेळी प्रथम क्रमांक मानाची पैठणी – तेजस्विनी परशुराम पाटील ,द्वितीय क्रमांक – सुवर्णा संतोष पोवार तृतीय क्रमांक  – सोनाली अमित देसाई यांनी पटकविला.

या पैठणीच्या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक विशाल बेळवळेकर पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वागरे यांनी केले.यावेळी प्रतिष्ठानचे योगेश भोईटे, निलेश भोईटे, विशाल भोईटे, आशिष पाटील ,उत्तम चांदेकर, युवराज पोवार, प्रदीप चांदेकर, सुधीर कांबळे आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
??????