ताज्या घडामोडी

दुग्धजन्य पदार्थ व कृषी उत्पादने यावर केंद्र सरकारने लावलेली जीएसटीची दरवाढ रद्द करा – वंचित बहुजन आघाडीची माग

कोल्हापूर  ;  करमुक्त स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमूळे महागाईत अवाजवी वाढ झालेली आहे त्यामूळे दरवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे
वंचित बहुजन आघाडीच्या वातीने जिल्हाध्यक्ष प्रा.विलास कांबळे यांच्या नेतृत्वा खाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे दक्षिण कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष प्रा.दयानंद कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रविना कांबळे, जिल्हा उपाध्यक्षा ज्योतीताई कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद भीमराव गोंधळी करवीर तालुका अध्यक्ष, िल्हा महासचिव महादेव कुंभार, सिध्दार्थ कांबळे, जिल्हा सचिव तुषार कांबळे, कोल्हापूर शहर महासचिव मल्हार शिर्के, संदीप खोत, राजू सुतार, युवा आघाडी महासचिव कृष्णात कांबळे, हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापूरे, जिल्हा सह सचिव रावसाहेब निर्मळे , विश्वास फरांडे, शितल माने, अर्जुन कांबळे, प्रल्हाद गोंधळी, संतोष कांबळे, तानाजी काळे ( मामा), राजू कांबळे, राजू कुंभार, राजू जाधव, संदीप गोंधळी,शंकर कांबळे, रोहित कांबळे,दीपक मळावी, राधानगरी युवा आघाडी अध्यक्ष प्रवीण कांबळे, शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, नितीन नागाठीले, करवीर युवा आघाडी अध्यक्ष नितीन कांबळे, आकाश कांबळे, अमित काळे, आदिं उपस्थित होते
प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमूळे सामान्य जनता त्रस्त असतांना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून 18 जुलै पासून आता अनेक दैनंदिन वस्तूसाठी नागरिकांना जास्तचे पैसे मोजावे लागणार आहेत , आजपर्यंत करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादनांवर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महागाईत प्रचंड वाढ होणार आहे,
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितामन यांनी काही नविन उत्पादने , वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दरवाढ जाहिर केले आहे, त्यात पाच टक्के कर दर स्लॅब अंतर्गत राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्विकारण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रचंड दरवाढ होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे,
पुढे निवेदनात म्हटले आहे की, पनीर, लस्सी, ताक, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ ईतर कडधान्ये, तृणधान्ये , मध, पापड, अन्नधान्य,मांस आणि मासे ( फ्रोजन वगळता ) मुरमूरे आणि गुळ यारखी कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमूळे प्रचंड दरवाढ होणार आहे , आतापर्यंत ब्रॅंडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थावर पाच टक्के जीएसटी आकारले जात होते तर अनपॅक केलेल्या व लेबल नसलेल्या वस्तू करमुक्त होत्या अशा सामान्य जनतेच्या हिताच्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जीएसटीच्या कक्षात समाविष्ट केल्याने केंद्र सरकारने सामान्य माणसाच्या आयुष्यात आणखी अडचणी वाढविल्या, त्यामूळे गोरगरिबांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार असल्याने ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे
या वेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, प्रा. दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्षा रविना कांबळे, यांची भाषणे झाली.

Related Articles

Back to top button
??????