ताज्या घडामोडी

ज्येष्ठांना, दिव्यांगांना घरातूनच मतदान करता येणार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर दिव्यांग नागरिक यांना आता घरातूनच मतदान करता येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रिकांत देशपांडे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक घोषीत झाल्यानंतर ५ दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे १२ डी क्रमांकाचा अर्ज ज्येष्ठ मतदारांनी सादर करावयाचा आहे. जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची सुविधा संबधिताच्या घरी करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणूका लवकरच जाहिर होतील. त्याची पुर्वतयारी आता सुरु असून जिल्ह्या जिल्ह्यात निवडणूक ऑफिस भेटी सुरु आहेत. पुणे येथे पहिली भेट असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. यावेळच्या निवडूकीत काही धोरणात्मक बदल झाले असून दिव्यांग व ८० वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना प्रत्यक्ष घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न असल्याचे श्रिकांत देशपांडे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????