ताज्या घडामोडी

एकत्र कुटुंब पद्धती एकी शिकविते- मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर : एकत्र कुटुंब पद्धती एकी शिकविते, एकत्र कुटुंबाची ताकद खूप मोठी असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज केले. महिला दिनानिमित्त पाच पिढ्यातील महिलांचा सन्मान महेंद्र ज्वेलर्स परिवारातर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरिमाराजे बोलत होत्या.
 महेंद्र ज्वेलर्सचा ११७ वा वर्धापनदिन नुकताच झाला. ग्राहक हित डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असणाऱ्या या पेढीशी ग्राहकांचे पिढ्यान पिढ्या नाते तयार झाले आहे. ऑनलाईन युगात आज युवा पिढी प्रत्यक्ष येथेच येऊन त्यांना हवी तशी दागिन्यांची खरेदी करीत आहे.दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांमध्ये महेंद्र परिवारातर्फे कोणताच कार्यक्रम झाला नाही. त्यामुळेच यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी सभागृह पाच पिढ्यातील महिलांनी तुडुंब भरून होते. यावेळी ८५ कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. सौ.मधुरिमाराजे यांनी आपल्या भाषणातून उत्कृष्ट असा संवाद तर साधलाच शिवाय कित्येक महिलांसोबत सेल्फीचा आनंदही लुटू दिला.‘प्रेमळ नाते पाच पिढ्यांचे’महेंद्र ज्वेलर्सचे कर्मचारी अजित करढोणे यांनी प्रेमळ नाते पाच पिढ्यांचे ही कविता सादर केली. यावेळी उपस्थित महिलांनी कवितेचा मनमुराद घेतला.

प्रा. महेंद्र कुलकर्णी यांनी खुमासदार सूत्रसंचालनातून सगळ्यांची मने तर जिंकलीच शिवाय कुटुंब व्यवस्था एक चिंतन या विषयावर मोजक्या शब्दात विवेचन देखील केले. भरत ओसवाल यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी महेंद्र ज्वेलर्स परिवारातर्फे देविचंद, चंद्रकांत, मितेश मेहुल, कुशल, अंकित व निकिता ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????