ताज्या घडामोडी

अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघाच्या वरीष्ठ गटात निवड….

कोल्हापूर ; क्रीडा नगरी कोल्हापूरचा यूवा फुटबॉलपटू व आयएसएल लिग स्पर्धेतील विजेता हैद्राबाद एफसी संघातील फॉरवर्ड अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघाच्या वरीष्ठ गटात निवड झाल्याबद्दल त्यांचे आज कोल्हापुरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. वरीष्ठ गटात व अंतिम संघात निवड होणारा तो पहिला कोल्हापूरकर 

याप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी बोलताना म्हणाले शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला आतंरराष्ट्रीय नावलोकीक मिळवून देण्याची कामगिरी केल्याबद्दल सर्वच कोल्हापूरकरांना त्याचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनिकेतच्या या यशस्वी वाटचालीमुळे कोल्हापूरातील फुटबॉल खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. कोल्हापूरातील फुटबॉलला आणि खेळाडूंना चालना मिळावी व अधिकाधिक फुटबॉलपटू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????