ताज्या घडामोडी

10 वी व 12 वी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात इलेक्ट्रानिक वस्तू वापरास बंदी

कोल्हापूर ;  जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात दि.21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 9 वाजल्यापासून ते सायं. 18.30 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश परीक्षेचे कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू नसतील.

Related Articles

Back to top button
??????