ताज्या घडामोडी

शाहू मिलमध्ये रविवारी स्वच्छता मोहिम

कोल्हापूर : सन २०२२ हे वर्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी चे वर्ष आहे. या निमित्ताने दि. १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या काळात कोल्हापूरात राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व संपन्न होत आहे.

या दरम्यान ऐतिहासिक शाहू मिलमध्ये छायाचित्र प्रदर्शन, कृषी प्रदर्शन आणि सांस्कृतिकसह अनेक उपक्रम संपन्न होणार आहेत. अनेक वर्षाच्या कालावधी नंतर शाहू मिलमध्ये हे कार्यक्रम होणार असून या कार्यकमापुर्वी शाहू मिलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या स्वच्छता अभियानात कोल्हापूर शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, महाविद्यालये आणि करवीर नगरीतील शाहूप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
??????