ताज्या घडामोडी

रकूल प्रीतसिंह – जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात

गोव्यात रंगला शाही विवाह सोहळा

मुंबई: गेल्या अनेक दिवसात मनारंजन क्षेत्रात टॉप गॉसिपींग सुरु असलेले लव्ह कपल अभिनेत्री रकुल प्रित सिंह व अभिनेता निर्माता जॅकी भगनानी यांनी आज लग्नगाठ बांधली. गोवा येथील आयटीसी ग्रँड या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचे कुंटूंबीय आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींची उपस्थिती होती.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, आयुष्यमान खुराणा, अर्जून कपूर, डेव्हीड धवन, महेश मांजरेकर यांच्यसह अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. आता या जोडप्याचा मुंबई येथे ग्रँड रिसेप्शन सोहळा होणार आहे. लग्नावेळी पाहूण्यांसाठी ग्लुटेन फ्री, शुगर फ्री मेन्यू ठेवला गेला होता.

Related Articles

Back to top button
??????