ताज्या घडामोडी

गारगोटी येथे मराठा समाजाचा सारथी जनजागृती मेळावा संपन्न

गारगोटी : मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सारथी संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज गारगोटी येथे सारथी जनजागृती मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजी राजे फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक सारथी संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉक्टर श्री विलास पाटील हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सारथी संस्था मराठा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आर्थिक सहाय्य करते व यूपीएससी एमपीएससी करणाऱ्यां विद्यार्थ्यांना कसा आर्थिक लाभ देते याची माहिती दिली तसेच एन एम एम एस स्कॉलरशिप ,परदेशी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक योजना, आयआयटी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा मिळणारी आर्थिक मदत या सर्व योजनांची माहिती डॉ.विलास पाटील यांनी आपल्या भाषणात दिली तत्पूर्वी सकल मराठा समाज भुदरगडचे श्री सचिन भांदिगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भुदरगड तालुक्यातील मराठा समाजाने उभारलेल्या आंदोलनाची माहिती उपस्थितांना दिली व यापुढेही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कार्यरत राहणार असल्याचे अभिवचन दिले छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचे समन्वयक उदय घोरपडे यांनी तालुका वार सारथी जनजागृती चे मेळावे घेणार असल्याचे सांगितले याची सुरुवात भुदरगड तालुक्याने केल्याबद्दल सकल मराठा समाज भुदरगड यांचे त्यांनी कौतुक केले यावेळी भुदरगडची कन्या कु सायली सारंग हिने एन एम एम एस परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून मराठा समाजाची मान उंचावल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला सकल मराठा समाजाचे समन्वयक मच्छिंद्र मुगडे यांनी आपल्या भाषणामध्ये भुदरगड तालुक्यामध्ये असणाऱ्या गुणवत्तेचा उल्लेख केला व आर्थिक कारणांसाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये यासाठी सारथीच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमासाठी सारथीचे स्वरूप यादव संतोष पवार देसाई सकल मराठा समाज भुदरगडचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे दुर्ग शिल्लदाचे आनंद देसाई रांगना प्रतिष्ठानचे शशिकांत पाटील माजी उपसरपंच सचिनबाबा देसाई डॉ ए एम पाटील मुख्याध्यापक एस पी पाटील बजरंग कुरळे संग्राम सिंह पोफळे संतोष मेंगाने पार्थ सावंत मानसिंग देसाई तुकाराम देसाई चंद्रकांत गोजारे सुशांत माळवी रोहित तांबेकर शशिकांत वाघरे स्वप्नील साळुंखे सकल मराठा समाज भुदरगड, स्वराज्य संघटना, दुर्ग शिलेदार ,रांगणा प्रतिष्ठान, छत्रपती प्रतिष्ठान ,हरिभाऊ देसाई फाउंडेशन, प्रहार संघटना ,सहयोग फाउंडेशन, भुदरगड प्रतिष्ठान आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????