ताज्या घडामोडी

आयपीएल : पहिला मुकाबला दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यात

मुंबई : आयपीएल १७ चे बिगुल वाजले असून २२ मार्चला पहिल्या सामन्याचा थरार रंगणार आहे. चेन्नई मध्ये संध्याकाळी साडे सहा वाजता सलामीचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगरुळ व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग यांच्यामध्ये रंगणार आहे. दोन्ही संघाचे व विशेषता धोनी व कोहली यांच्या कट्टर चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सूकता लागून राहिली आहे. दोन्ही संघाचे फॅन
फॉलोअर्स आता २२ मार्चची वाट पाहत आहे.

धोनीला आयपीएलमध्ये खेळताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गतसाली गुजरात टायटन्सला हरवून चेन्नई संघाने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावण्याचा मान आता चेन्नईच्या नावावर आहे. विराट – धोनी भिडणार असल्याने प्रेक्षकांची उत्सूकता ताणली आहे. त्याचबरोबर अनेकांचा फेवरेट मुंबई इंडियन्स संघ २४ मार्चला  गुजरात टायटन्स सोबत लढणार आहे.

Related Articles

Back to top button
??????