ताज्या घडामोडी

दंड भरा अन्यथा कारवाईस सामोरे जा !

महाराष्ट्र शासनाचा एक राज्य एक चलन  एप्रिल २०१९ पासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कार्यान्वित आहे. त्यामधे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १, ७२, ७५७ इतक्या इतक्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली होती. पण ज्यांचा दंड पेंडींग होता, त्याची रक्कम एकूण ७, ३१, ६५५०० इतकी होती. त्याबाबत मा. विधी न्यायप्रधिकरण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत पेंडींग दंड भरण्याबाबत मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात आला असून, वाहन धारकांनी दिनांक १५/२/२०२२ ते दिनांक १२/३/२०२२ यावेळेत १९, ४८२ ई-चलान केसेसचा दंड भरला.

त्याची एकूण किंमत ७४लाख ५१ हजार२०० इतकी किंमत शाखेकडे जमा झालेली आहे. सोबत १२/३/२०२२ रोजी लोक अदालत दिवशी १, ३३२ इतक्या अनपेड केसेसचा दंड ५ लाख २३ हजार २५० इतका जमा झालेला आहे. तसेच ६९ इतक्या वाहनधारकांचे लायसन निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

तरी वाहन धारकांनी आपल्या वाहनावरील अनपेड दंड भरावा व मा. कोर्टाकडून होणारी कारवाई टाळावी असे आवाहन शहर वाहतूक शाखा कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
??????